दिनेश सोनवणे
दौंड : राजेगाव (ता.दौंड) येथे जिवा महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिवा महाले यांच्या प्रथिमेचे सर्वात प्रथम पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रवीण लोंढे तसेच तालुक्यातील विविध नाभिक बांधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर या जयंतीचे आयोजन दौंड तालुक्यातील नाभिक बांधवांनी केले होते.
यावेळी बोलताना दौंड तालुका नाभिक महामंडळ अध्यक्ष गणेश साळुंखे म्हणाले की, राजेगाव गावाला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. जिवा महाले यांना वतनी परगणा दिलेले गाव आहे. या गावचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी लावकरच येथे भीमा नदीच्या तिरावर जिवा महाले यांचे स्मारक व त्यांच्या पुरात्न वाडयात स्मारक बांधन्यात येणार आहे.
यावेळी नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश पांडे, पोलीस पाटील महेश लोंढे, मिलिंद मोरे, रमेश शितोळे, शशिकांत वाघमारे, योगेश वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, सचिन जाधव, गणेश साळुंखे, अश्विनी बंड, महादेव साळुंखे, सुभाष जाधव, आप्पा पंडित, डिंगबर जाधव, चंद्रकांत लोखंडे, सागर माने आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, राजेगाव हे एक ऐतीहसीक गाव म्हणून परिसरात एक वेगळी ओळख आहे. ”होता जिवा, म्हणून वाचला शिवा” या म्हणी प्रमाणे जीवाजींना शिवाजी महाराजानी वतनी परगणा म्हणून राजेगाव हे गाव दिले होते. या भागात शिवाजी महाराज व जिवा महले यांचे पद स्पर्श झाले आहेत. त्यामुळे या भागात जिवाजिनचे एक स्मारक होण्याची मागणी यावेळी नाभिक बांधव करत आहेत.