Jejuri News : जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज सनई-चौघड्यांच्या निनादात शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या हस्ते येथे घटस्थापना करण्यात आली. दर्शनासाठी भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले आहेत.
दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जेजुरीमध्ये दाखल
आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून, सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. नवरात्र उत्सवानिमित्ताने खंडोबा मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे तर ऐतिहासिक गडाला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सारा गड उजळला आहे. (Jejuri News) देवीचाअन् स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे.
महालक्ष्मी मंदिरात गोल्डन टेम्पलचा देखावा
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीचे मंदिर सजले आहे. सकाळपासून दर्शनासाठी भक्तांची मंदिरात गर्दी होत आहे. (Jejuri News) यंदा महालक्ष्मी मंदिरात गोल्डन टेम्पलचा देखावा साकारला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची विधिवत पूजा संपन्न झाली. यंदा महालक्ष्मी मंदिर दर्शन पुण्यातील महत्त्वाच्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. पुणे मेट्रोच्या सर्व महिला अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मंदिर प्रशासनाच्या वतीने उद्या सन्मान होणार आहे.
वणीच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी
साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी होत आहे. संस्थानचे अध्यक्ष मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते दागिने आणि पादुका पूजन संपन्न झाले. पारंपारिक वाद्य वाजवत देवीची मिरवणूक काढण्यात आली. (Jejuri News) सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला आभूषणे आणि वस्त्र परिधान करण्यात आले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मुख्य न्यायाधीश बी. जी. वाघ यांच्या हस्ते देवीची आरती सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jejuri News : कोयत्याने वार करून दुचाकीस्वारावराची लूट; आरोपीला पिंगोरीतील शेतातून अटक