आशिष गायकवाड (वन्यजीव अभ्यासक)
International Tiger Day, पुणे : आज जागतिक व्याघ्र दिन ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसही म्हणतो. आजचा हा दिवस व्याघ्र संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठीही साजरा केला जातो. 2010 मध्ये रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात जागतिक व्याघ्र परिषद झाली. या परिषदेमध्येच 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन व त्यासंदर्भातली जागतिक स्तरावरची प्रणाली व व्यवस्थापन हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानिमित्ताने वाघाविषयी थोडी माहिती. (International Tiger Day)
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. वाघ दिसायला साधारणपणे नारंगी पिवळसर रंगाच्या केसांवर काळया रंगाचे उभे पट्टे आणि पोटाचा काही भाग पांढरा. काही वाघ पूर्ण पांढऱ्या रंगाच्या केसावर काळे उभे पट्टे असेही असतात, त्यांना पांढरा वाघ असे म्हणतात. तसे वाघ काही लाख वर्षांपासून पृथ्वीवर आहेत, पण 1758 साली अभ्यास करण्याच्या दृष्टीने वाघाचे पहिले शास्त्रीय वर्णन करण्यात आले, तेव्हा त्याला त्याचे शास्त्रीय नाव पँथेरा टिग्रिस असे देण्यात आले. तर याच वाघाला इंग्रजीत टायगर असेही म्हटले जाते. (International Tiger Day)
तुम्हाला माहितीये का, वाघाला साधारणपणे नऊ प्रजातींमध्ये विभागले गेले आहे. पण सध्या वाघाच्या फक्त तीनच प्रजाती शिल्लक आहेत. वाघाच्या प्रजातींमध्ये बंगाल वाघ, कॅस्पियन वाघ, सायबेरियन वाघ, दक्षिण चिनी वाघ, इंडोचायनिज वाघ, मलयन वाघ, जावा वाघ, बाली वाघ, सुमात्रन वाघ अशा प्रजाती आहेत. या नऊ प्रजाती होत्या. मात्र, काळाच्या ओघात, शिकारीत आणि आधुनिकीकरणाच्या ओघात नामशेष झाल्या. आज सगळ्यात जास्त बंगालचा वाघ पाहायला मिळतो. (International Tiger Day)
80 टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात
जगाच्या एकूण व्याघ्रसंख्येच्या 80 टक्क्यांहून जास्त वाघ हे भारतात आढळतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. 2023 सालच्या गणनेनुसर भारतात 3167 वाघ आहेत. आणि जगात एकूण 4800 वाघ आहेत. 1973 साली व्याघ्र संवर्धन मोहिमेअंतर्गत व्याघ्र अभयारण्य स्थापन करण्यास सुरुवात झाली.
भारतात 54 व्याघ्र अभयारण्य
भारतात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. आज भारतात 54 व्याघ्र अभयारण्य आहेत. महाराष्ट्रातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण अभ्यासकांच्या मते वाघांची घनता ही ताडोबामध्ये सर्वात जास्त आहे. (International Tiger Day)
महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्रप्रकल्प आहेत.
1. मेळघाट
2. ताडोबा – अंधारी
3. पेंच
4. नवेगाव
5. बोर
6. सह्याद्री
दरम्यान, यावर्षी नक्की यापैकी एका तरी व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. हा प्राणी जेवढा हिंस्र समाजाला जातो त्याही पेक्षा त्याचं नैसर्गिक अधिवासामधील सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे.