Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

International Tiger Day : वाघांची संख्या होतीये कमी ; नऊपैकी केवळ तीनच प्रजाती शिल्लक, गरज आहे संवर्धनाची…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 July 2023, 13:53

आशिष गायकवाड (वन्यजीव अभ्यासक)
International Tiger Day,  पुणे : आज जागतिक व्याघ्र दिन ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसही म्हणतो. आजचा हा दिवस व्याघ्र संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठीही साजरा केला जातो. 2010 मध्ये रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात जागतिक व्याघ्र परिषद झाली. या परिषदेमध्येच 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन व त्यासंदर्भातली जागतिक स्तरावरची प्रणाली व व्यवस्थापन हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानिमित्ताने वाघाविषयी थोडी माहिती. (International Tiger Day)

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. वाघ दिसायला साधारणपणे नारंगी पिवळसर रंगाच्या केसांवर काळया रंगाचे उभे पट्टे आणि पोटाचा काही भाग पांढरा. काही वाघ पूर्ण पांढऱ्या रंगाच्या केसावर काळे उभे पट्टे असेही असतात, त्यांना पांढरा वाघ असे म्हणतात. तसे वाघ काही लाख वर्षांपासून पृथ्वीवर आहेत, पण 1758 साली अभ्यास करण्याच्या दृष्टीने वाघाचे पहिले शास्त्रीय वर्णन करण्यात आले, तेव्हा त्याला त्याचे शास्त्रीय नाव पँथेरा टिग्रिस असे देण्यात आले. तर याच वाघाला इंग्रजीत टायगर असेही म्हटले जाते. (International Tiger Day)

तुम्हाला माहितीये का, वाघाला साधारणपणे नऊ प्रजातींमध्ये विभागले गेले आहे. पण सध्या वाघाच्या फक्त तीनच प्रजाती शिल्लक आहेत. वाघाच्या प्रजातींमध्ये बंगाल वाघ, कॅस्पियन वाघ, सायबेरियन वाघ, दक्षिण चिनी वाघ, इंडोचायनिज वाघ, मलयन वाघ, जावा वाघ, बाली वाघ, सुमात्रन वाघ अशा प्रजाती आहेत. या नऊ प्रजाती होत्या. मात्र, काळाच्या ओघात, शिकारीत आणि आधुनिकीकरणाच्या ओघात नामशेष झाल्या. आज सगळ्यात जास्त बंगालचा वाघ पाहायला मिळतो. (International Tiger Day)

 

80 टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात

जगाच्या एकूण व्याघ्रसंख्येच्या 80 टक्क्यांहून जास्त वाघ हे भारतात आढळतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. 2023 सालच्या गणनेनुसर भारतात 3167 वाघ आहेत. आणि जगात एकूण 4800 वाघ आहेत. 1973 साली व्याघ्र संवर्धन मोहिमेअंतर्गत व्याघ्र अभयारण्य स्थापन करण्यास सुरुवात झाली.

भारतात 54 व्याघ्र अभयारण्य

भारतात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. आज भारतात 54 व्याघ्र अभयारण्य आहेत. महाराष्ट्रातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण अभ्यासकांच्या मते वाघांची घनता ही ताडोबामध्ये सर्वात जास्त आहे. (International Tiger Day)

महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्रप्रकल्प आहेत. 

1. मेळघाट
2. ताडोबा – अंधारी
3. पेंच
4. नवेगाव
5. बोर
6. सह्याद्री

दरम्यान, यावर्षी नक्की यापैकी एका तरी व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. हा प्राणी जेवढा हिंस्र समाजाला जातो त्याही पेक्षा त्याचं नैसर्गिक अधिवासामधील सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा : राष्ट्रवादीचे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुदंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.