Talegaon News : तळेगाव ढमढेरे : कोणत्याही गावची ओळख सांगणारी अथवा माहिती देणारी म्हणजे गावची वेस अथवा कमान. असे असताना शिरुर तालुक्यातील दुर्गम भागातील खैरेवाडी गावाला प्रवेशद्वार नसल्याने ज्येष्ठ कै. ह. भ. प. बाळासाहेब जयवंत खैरे यांच्या स्मरणार्थ गावाला नुकतीच कमान बांधून देऊन कमानीचे लोकार्पण करण्यात आल्याने गावाला कमान (वेस) मिळाली आहे.(Talegaon News)
गावासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेली कमान बांधून देण्याचा निर्णय घेतला.
खैरेवाडी (ता.शिरुर) येथील ह. भ. प. बाळासाहेब खैरे यांचे गावामध्ये मोलाचे योगदान असल्याने त्यांच्या निधनानंतर आपण गावासाठी काहीतरी करावे, अशी भावना बाळासाहेब खैरे यांचे बंधू उद्योजक श्रीकांत खैरे यांच्या मनामध्ये असल्याने त्यांनी गावातील ग्रामस्थांशी चर्चा करुन गावासाठी मुख्य प्रवेशद्वार असलेली कमान बांधून देण्याचा निर्णय घेतला. या कमानीचे काम पूर्ण होताच कमानीचे लोकार्पण करण्यात आले असून, याप्रसंगी भीमाशंकर सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील, माजी सभापती देवदत्त निकम, प्रकाश पवार, सुभाष उमाप, शंकर जांभळकर, हिवरे सोसायटीचे चेअरमन अमोल जगताप, उपसरपंच दिपक खैरे, खैरेनगरचे सरपंच संदीप खैरे, कान्हूर मेसाईचे माजी सरपंच बंडू पुंडे, पिंपळेचे सरपंच बापू धुमाळ यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.(Talegaon News)
दरम्यान, उद्योजक श्रीकांत खैरे यांच्या कुटुंबियांसह पशुवैद्यकीय डॉ. निखिल सुभाष खैरे यांना पदवी प्राप्त झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक नंदकिशोर गोडसे यांनी केले तर माजी सरपंच नवनाथ खैरे यांनी आभार मानले.(Talegaon News)