उरुळी कांचन, (पुणे) : तरुण शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतः उद्योजक होतील त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल व शेतकऱ्यांच्या हक्काचे मार्केट उपलब्ध होईल असे असे प्रतिपादन हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केले.
भवरापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एस.एस. अॅग्रो फूड्स या कंपनीला तहसीलदार कोलते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वरीप प्रतिपादन केले. यावेळी उद्योजक सुभाष साठे व एक्सपोर्ट मार्केटिंग संभाळणारे त्यांचे चिरंजीव गौरव साठे यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एस. एस. अॅग्रो फुडसचे संचालक सुभाष साठे, गौरव साठे, माजी पंचायत समिती सदस्य धंनजय साठे, सरपंच सचिन सातव, माजी सरपंच बबनराव साठे, ग्रामपंचायत सदस्य योगेश साठे, उद्योजक संजय साठे, राजेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना कोलते म्हणाल्या, “एस.एस. अॅग्रो फूड्सप्रमाणे आणखी प्रकल्प युनिट्स जर उभे राहिले तर शेतकऱ्यांचा माल हमी भावाने विकला जाईल व कितीही बाजारभाव खाली आले तरी शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून ठेवल्यास शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू शकेल.