दीपक खिलारे
HSC Result: इंदापूर : इंदापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेच्या मुला- मुलींचा बारावीचा निकाल ८९.५८ टक्के लागला असून दोन्ही शाखेंनी कॉलेजच्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे.
बारावीच्या परीक्षेला कॉलेजचे विज्ञान शाखेचे २८ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते.(HSC Result) त्यामधील २६ उत्तीर्ण झाले. कला शाखेचे २० पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेचे पहिले तीन विद्यार्थी
१) कु. स्वप्नाली ब्रह्मदेव कदम – ७६.१७ % (प्रथम क्रमांक)
२) कु. सानिका संजय चव्हाण – ७०% (द्वितीय क्रमांक)
३) अनिल रामदास मंजुळे.- ६६.३३% (तृतीय क्रमांक)
कला शाखेचे पहिले तीन विद्यार्थी
१) कु. अश्विनी गणेश कदम – ५८.८३ % (प्रथम क्रमांक)
२) राम नवनाथ इंगोले – ५२.८३ % (द्वितीय क्रमांक)
३) आदित्य युवराज मखरे – ५२.५०% (तृतीय क्रमांक)
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संचालकांकडून अभिनंदन
दरम्यान, उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे व प्राचार्या अनिता साळवे यांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन केले.(HSC Result)
तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
HSC Result | उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा बारावीचा निकाल ८७.०१ टक्के..
HSC Result : पंचगणी इंटरनॅशनल हायस्कूलचा बारावीचा निकाल शंभर टक्के..