पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामान बदलाचे वारे फिरताना दिसत आहेत.विशेषत: कोकण विभागात तापमानाचा पारा वाढत असून पुढील काही दिवस या ठिकाणी उष्ण वातावरण असण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आज 8 मार्च 2025 ला राज्यातील कोणत्या जिल्ह्यात तापमानाची परिस्थिती काय असेल, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये असेल कोरडं वातावरण
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात कोरडं वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान पालघर जिल्ह्यात काल शुक्रवारी कोरड्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज शनिवारीही पालघरमध्ये कोरडं हवामान असणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे.