Health Tips : पांढरेशुभ्र दात आपले व्यक्तिमत्त्वही सुधारतात. पण दातांमध्ये लागलेली किड एकदा लागली की बाहेर पडण्याचं नावंच घेत नाही. स्वच्छ सुंदर दात केवळ तुमचं सौंदर्यंच वाढवत नाहीत. तर, तुमच्या स्माईललाही मोठं बनवतात. दातात निर्माण झालेली पोकळी, किड दात खराब करण्याचे काम करू शकतात. चला तर मग आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगतो ज्यामुळे या समस्येपासून सुटका होऊ शकते. दात स्वच्छ नसणे, तोंडात बॅक्टेरियाचा संसर्ग, गोड पदार्थांचे जास्त सेवन किंवा आरोग्याची कोणतीही समस्या.
दातांची किड दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा :
लवंग : भारतीय स्वयंपाकघरात लवंग असतेच. लवंग हा खड्या मसाल्यातील एक मसाला आहे. त्याचा वास उग्र असतो ज्यामुळे ती अखंडच वापरली तरी तिचा स्वाद घरभर पसरतो. लवंग आपल्याला केवळ दातांची किड नाही तर अनेक प्रकारच्या तोंडी समस्येशी लढण्यास मदत करते.
याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आपल्याला वेदना कमी करण्यास देखील मदत करतात. लवंगाच्या तेलाचा वापर करून दातांच्या कृमींपासून आराम मिळू शकतो.
दात लवकर खराब होण्यामागे कारणीभुत आहेत या सवयी :-लसूण : लसणाशिवाय कोणतीही फोडणी अपूर्ण तसेच आरोग्यही. भारतीय स्वयंपाकघरात असलेला लसूण केवळ जेवणातील चव वाढवण्याचे काम करत नाही. तर आरोग्यासाठी ही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लसूणमध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म हे एक उत्तम वेदनाशामक बनवतात, ज्यामुळे दातदुखी आणि किडीपासून मुक्ती मिळू शकते. लसणाशिवाय कोणतीही फोडणी अपूर्ण तसेच आरोग्यही…
मिठाचं पाणी : दाताला लागलेली किड आणि दुखण्यामध्ये मिठाच्या पाण्याचा खूप उपयोग होऊ शकतो. हे आपले तोंड बॅक्टेरियापासून मुक्त ठेवते आणि पोकळीतील चिकटपणा देखील काढून टाकते. मीठ पाणी आपल्या तोंडातून आम्ल काढून तोंडाची पीएच पातळी सामान्य करू शकते. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करून तुम्ही किडलेल्या दातांना बरे करू शकता.
लिंबू : लिंबू व्हिटॅमिन-सीने भरलेला असतो. यात असलेले ऍसिड जंतू नष्ट करून वेदना कमी करण्यास मदत करतात. लिंबाचा तुकडा तोंडात घालून चावून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे दातातील वेदना कमी होतात. अन् किडलेल्या दातांपासूनही आराम मिळतो.