Health Tip : पुणे : हिवाळ्यात खोकला, सर्दी हे आजार अधिक प्रमाणात जाणवतात. पण जर तुमच्या घरात या 5 गोष्टी असतील तर कफ, खोकला आणि त्याच्या इतर प्रकारांना घाबरण्याची गरज नाही. या घरगुती गोष्टी औषधे आणि सिरपपेक्षा अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरतात. या घरगुती उपायांमध्ये रसायने आणि अल्कोहोलसारखे हानिकारक पदार्थ नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते इतर फायदे देखील देतात. हिवाळ्यात या घरगुती उपायांचे रोज सेवन केल्याने कफ आणि खोकल्यापासून सुटका मिळते.
घरगुती उपाय कफ सिरपपेक्षा चांगले
हे 5 घरगुती उपाय कफ सिरपपेक्षा चांगले ठरतात. ते तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतील. फुफ्फुस साफ करण्यास मदत देखील करतील. छातीत दुखणे, हलका खोकला, घशातील दुखापत, पिवळा किंवा पांढरा कफ अशा बाबतीत या घरगुती गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. हे उपाय मुलांवरही फायदेशीर ठरू शकतात.
जिरे पाणी : खोकला आणि सर्दी झाल्यास एक चमचा जिरे घेऊन ते एका ग्लास पाण्यात उकळवा. पाणी उकळले की ते कोमट करा आणि प्या. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. परिणामी घसा आणि फुफ्फुसांना आराम मिळतो आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.
ओवा : ओवा हंगामी आजारांपासून संरक्षण देतो. ओव्यात खोकला मुळापासून नष्ट करण्याची ताकद आहे. ओव्याचे पाणी उकळून प्यायल्याने नाक बंद होणे, छाती जड होणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
मेथीचे : एक चमचा मेथी घ्या आणि एक कप पाण्यात उकळवा. ५ मिनिटांनंतर मेथी गाळून घ्या आणि त्यानंतर ते पाणी प्या. कफ, खोकला आणि घसादुखीसाठी हा एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.
अद्रक : हिवाळ्यात आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार, त्यात खोकला आणि कफ दूर करणारे गुणधर्म आहेत. एक इंच आले घेऊन एक कप पाण्यात ५ मिनिटे उकळा आणि नंतर हा चहा गाळून प्या.
आवळा : आवळा हा फार आयुर्वेदीक मानला जातो. घरीच त्याचा रस काढा. हा रस दिवसातून एक चमचा, दोन वेळा घेतल्यास छातीतील जळजळ, घशातील सूज, खोकला आणि वेदना यापासून आराम मिळतो.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे कोणत्याही प्रकारे औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही.