हनुमंत चिकणे
बार्शी : गुळपोळी (ता. बार्शी) येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता. ०२) करण्यात येणार आहे. तसेच हभप लक्ष्मण महाराज कोकाटे मठाधिपती श्री क्षेत्र कान्हेरी देवस्थान काटेवाडी (ता. बारामती) यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापणा होणार असल्याची माहिती डॉ. शरद तुकाराम चिकणे यांनी दिली.
यापुढे बोलतना डॉक्टर चिकणे म्हणाले, “शुक्रवारी सकाळी सकाळी सात वाजळ्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत विधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देव-देवतांची पूजा, पालखी (मूर्ती) संपूर्ण गावातून मिरवणूक सोहळा, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी दोन ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.”
रात्री आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, गुळपोळीसह पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गुळपोळी ग्रामस्थांनी केले आहे.
दगड घडवणे खूप कष्टाचे आणि वेळखाऊ काम असते. दगड घडवताना त्याचे चार टप्पे असतात त्यांना घडी असे म्हणतात. प्रत्येक घडीची वेगळी छिन्नी असते. एका विशिष्ट हातोडीने दगड हवा तसा फोडला जातो. त्यानंतर पहिली घडी म्हणजे वस्तूच्या आकारानुसार त्या दगडाचे पहिले ओबडधोबड कोरीवकाम. त्यानंतर दुसरी घडी, वस्तू आकार घेते. तिसरी घडी म्हणजे वस्तू ओबडधोबड स्वरूपात तयार होते आणि चौथी घडी म्हणजे वस्तूला सुबक, आकर्षक केले जाते. जेव्हा चौथी घडी चालू असते, तेव्हा वस्तूच्या कोरीवकामाचे चार प्रकार पडतात. अशा पद्धतीने सदर हनुमान मंदिर हे सजगुरी घडनीचे दगडी बांधकामात झाले असून सुमारे आजतागायत २५ लाख रुपये खर्च आला आहे.
याबाबत बोलताना डॉ. शरद चिकणे म्हणाले, “महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा मला आनंद आहे. श्री हनुमान हे दैवत शक्ती आणि स्वामी भक्तीचे प्रतीक आहे. तसेच हा कार्यक्रम वैयक्तिक नसून गावाच्या मारुतीचा कार्यक्रम आहे. गावच्या मारुतीचा कार्यक्रम असल्याने सर्वांनी प्रत्येकाचे कर्तव्य असून कार्यक्रमाला उपस्थिती लावावी.