सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी १५ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करुन घ्यावी. असे आवाहन परंड्याचे तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातील पिकाची पिक पहाणी स्वतः मोबाईल वरुन करण्याची सुविधा शासनाने दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल वरुन आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली नसेल त्यांनी प्ले स्टोअर वरुन ई पिक पाहणी व्हर्जन २ हे अॅप डाऊनलोड करुन घेऊन पिक पहाणी नोंदणी करावी. खरीप हंगामातील ई पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर आहे.
पिक पहाणी न नोंदविल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. ई पिक पाहणी नोंदणी करताना अडचण आल्यास संबंधित गावचे मंडळ अधिकारी, तलाठी,कृषी सहाय्यक,पोलीस पाटील किंवा कोतवाल यांच्याशी संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील आपली ई पिक पाहणी १५ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करुन घ्यावी. असे अवाहन परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांनी सोमवारी (ता.१०) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.