गणेश सुळ
Farm News : केडगाव : दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहूबेट परिसरात पावसाच्या हलक्या सरींमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे बाजरी पेरणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. पारंपरिक बैलाच्या सहाय्याने बाजरी पेरणीला शेतकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे.(Farm News)
बैलाच्या सहाय्याने बाजरी पेरणीला शेतकऱ्यांची मोठी पसंती.
दौंडच्या पश्चिम पट्ट्यात साधारणता ३० टक्के पर्यंत शेतकरी बाजरी पिकाला पसंती देतात. वातावरणातील गारवा, मुळा मुठा तसेच भीमा नदीकाठच्या गावातील तसेच बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बाजरीचे बियाणे कृषी सेवा केंद्रात घेण्याकडे शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे, असे संतोष भरणे यांनी सांगितले.(Farm News)
दरम्यान, शेतकऱ्यांनी खात्रीशीर दर्जेदार बियाण्यांची पेरणी करा. बियाणे घेताना नामांकित कंपनी तसेच बियाण्यांची उत्पादन तारीख, बियाण्यांची कालबाह्य मुदत (एक्सपायर डेट) तपासणी करा. अधिकृत कृषी सेवा केंद्रामध्येच बियाणे खरेदी करावे. असे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.(Farm News)
ट्रॅक्टर पेक्षा बैलाच्या साह्याने बाजरीची पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली राहते. बाजरी पातळ होत नाही तसेच बाजरीच्या उत्पादनात देखील अधिक भर पडते. बैलाच्या साह्याने पेरणी केल्यामुळे पेरणीसाठी कमी बियाणे लागतात.(Farm News)
अंकुशराव भरणे, प्रगतशील शेतकरी राहू (ता.दौंड)
,मागील ३० ते ३५ वर्षांपासून बाजरी, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, कारडई पेरणीची कामे करतो. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बैलाच्या साह्यानेच पेरणी करावी. जेणेकरून उगवण क्षमता चांगली राहते. उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होते.
– उत्तमराव मेमाणे, बियाणांची पेरणी करणारे शेतकरी.