पुणे : राज्यात दिव्यांग कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य ठरणार आहे. या मंत्रालयाकडून दिव्यांग विकासाच्या अनेक योजना राबवल्या जातील.
आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला. या मंत्रालयाची घोषणा तीन डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. नवीन मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांना योग्य न्याय मिळणार आहे.
या निर्णयामुळे दिव्यांगांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, दिव्यांग संघटनांच्या वतीने बुधवारी (ता. ३०) शनिवारवाड्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मूकबधिर-दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्क्षापन करण्यात यावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
त्यानिमित्त प्रहार अपंग क्रांती संस्था संलग्न महाराष्ट्र राज्य मूकबधिर-दिव्यांग कल्याण संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांग महिला-पुरुषांनी एकमेकांना लाडू भरवून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी रवी मुदगल, केतकी अहिरे, संगीता कुलकर्णी, सुनीता लाटे,अंजू गोविंदगिरी यांच्यासह प्रहार संघटनेचे अभय पवार, प्रकाश शिंदे, मीना धोत्रे, दत्ता भोसले आदी पदाधिकारी उपस्क्षित होते.
या वेळी मूकबधिर-दिव्यांगांनी मुख्यमंत्री एकनाक्ष शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्च कडू यांचे आभार मानले.