पुणे : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन म्हणून व्हॉट्सअॅप (WhatsApp)ची ओळख आहे. पण व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही हे तीन व्हिडिओ पाठवले तर तुम्हाला कारागृहाच जावे लागेल. कोणते हे तीन व्हिडिओ आहेत हे जाणून घेऊयात.
शेअर मार्केट टिप्स –
तुम्हाला जर प्रमाणित स्टॉक मार्केटचे ज्ञान नसेल, तर तुम्ही कोणालाही ऑनलाइन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देऊ नका. यासोबतच इनसाइडर ट्रेडिंग करू नका, कारण असे करणे सेबीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. अशा स्थितीत तुमच्याविरुद्ध कोणी तक्रार केल्यास किंवा सेबीच्या तपासात तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चाइल्ड पोर्नोग्राफी –
जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलात तर तुम्ही कायदेशीर गुन्हेगार झाला आहात. भारतात, तुम्हाला पॉस्को कायद्याच्या कलम 14 अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा होऊ शकते. चाइल्ड पॉर्न व्हिडिओ देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. POCSO कायदा 2012 अंतर्गत बाल पोर्नोग्राफी हा भारतात गुन्हा समजण्यात येतो.
गर्भपात माहिती –
गर्भपाताचे देशी फॉर्म्यूला सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका. तुम्हीही गर्भपाताचे औषध घेत असल्याचा व्हिडिओ पाठवलात तर पोलिस तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 नुसार गर्भपात हा गुन्हा मानला जातो. गर्भपात करवून घेणाऱ्यांना तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद कायद्यात आहे. भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. गर्भपात करताना पकडल्यास रुग्णावर तसेच रुग्णालयावर कारवाई केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकून गर्भपाताचा व्हिडिओ घरी कोणाला पाठवला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.