मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 35 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर आज आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर आता विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
कोण आहेत देवेन भारती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेंद्र भारती यांची ओळख आहे. 1994 च्या आयपीएस बॅचचे ते अधिकारी आहेत. भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त होते.
बातमी अपडेट होत आहे