संदीप टूले
Daund News : शासनाच्या जल जीवन मिशन योजनेमुळे आता प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणार आहे. असे मत भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी मांडले आहे.(Daund News)
विकास शेलार यांनी वरील मांडले आहे.
देलवडी (ता.दौंड) येथील ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून ५ कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले आहे. या योजनेचे भूमिपूजन सरपंच नीलम काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना(Daund News)
यावेळी दत्तात्रय शेलार, बापू शेलार, आर्जून शेलार, राजेंद्र शेलार, अनिल शेलार, अविदा अडागळे, गणेश लव्हटे, संजय पडळकर, यशवंत वाघोले, लक्ष्मण शेलार, विकास टकले, बाळासो जाधव, दत्तात्रय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.(Daund News)
यावेळी बोलताना सरपंच नीलम काटे म्हणाल्या कि, देलवडी ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत निधी मिळाल्यामुळे शुद्ध पिण्याचा पाण्याचा सोय उपलब्ध होणार असून महत्वपूर्ण गरज पूर्णत्वास येणार आहे. आमदार राहुल कुल यांचे विशेष प्रयत्नातून ही योजना मार्गी लागली असून त्याचबरोबर अंतर्गत रस्ते व इतर विकास कामे भरपूर प्रमाणात झाली आहेत. व चालू कामांसाठी आमदार राहुल कुल यांच्याकडून भरघोस निधी मिळत आहे.