Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : “तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो” ; माजी सरपंचाला व त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी ; चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 5 June 2026, 10:50

Loni Kalbhor : उरुळी कांचन, (पुणे) : “तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो” अशी धमकी देत पूर्ववैमनस्यातून माजी सरपंच व त्यांच्या भावाला लोखंडी रॉड आणि दगडांनी बेदम मारहाण करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गवते मळा परिसरात रविवारी (ता. 31) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor

माजी सरपंच अभिषेक प्रभाकर दाभाडे, (वय 27, धंदा शेती, सध्या रा. गवते मळा मारुती मंदीराशेजारी, तरडे, ता. हवेली) व समीर प्रभाकर दाभाडे अशी धमकी देऊन मारहाण झालेल्या भावांची नावे आहेत. तर चंपक उत्तम गवते, आप्पा दीपक गवते, रूपक उत्तम गवते, दीपक उत्तम गवते (सर्व रा. गवतेमळा, तरडे, ता. हवेली) अशी मारहाण करून धमकी देणाऱ्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक दाभाडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. Loni Kalbhor

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक दाभाडे यांचा भाऊ समीर दाभाडे हे रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावात अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त असलेला जेवणाचा कार्यक्रम आटोपून मित्रांसोबत घरासमोरील बाकावर बसला होता. त्यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून गावातील ओळखीचे इसम चंपक गवते व त्याचा पुतण्या आप्पा गवते हे दुचाकीवरून तिथे आले. Loni Kalbhor

यावेळी समीर यास विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत असल्याचे पाहून समीरने मामा आकाश चौधरी यांना फोन केला. मामाने फोनवरूनच चंपक गवते याला “जे काही असेल ते सकाळी समोरासमोर मिटवू” असे सांगून समजवण्याचा प्रयत्न केला. मामांनी समजवून सांगितल्यानंतरही काही वेळातच तिथे रूपक गवते आणि दीपक गवते हे आले. त्यांनी समीरला हाताने ढकलून मारहाण सुरू केली. भाऊ समीरने फोनवरून माहिती दिल्यानंतर फिर्यादी अभिषेक दाभाडे हे तात्काळ भावाला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. Loni Kalbhor

अभिषेक भांडण सोडवत असतानाच उत्तम गवते याने हातातील लोखंडी रॉडसदृश वस्तूने थेट अभिषेक यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या हल्ल्यात अभिषेक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी चंपक गवते याने “तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो” अशी थेट धमकी दिली. यावेळी दाभाडे तेथून पळत जात असताना आरोपींनी जमिनीवर पडलेले मोठे दगड फेकून मारले. यात त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. Loni Kalbhor

दरम्यान, याप्रकरणी वरील चौघांवर विविध कलमान्वये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार वैशाली नागवडे करीत आहेत. Loni Kalbhor

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तरड्यात अहिल्यादेवी जयंतीच्या उत्सवाला गालबोट! दोन गटात तुंबळ हाणामारी, 5 जखमी तर 7 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Friday, 5 June 2026, 12:43

लोणी काळभोरचे उद्योजक हेमंत हाडके यांच्यावर गुन्हा दाखल; कदमवाकवस्तीतील अनधिकृत बांधकाम भोवले, पूर्व हवेलीतील शेकडो बांधकामांवर कारवाई होणार का?

Friday, 5 June 2026, 12:27

भारताने जुन्या काळात अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही पैसे वसूल करतोय- ट्रम्प

Friday, 5 June 2026, 12:13

कुंजीरवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चाहूल लागताच जुगारी शेतातून पसार

Friday, 5 June 2026, 11:48

मेट्रो धावणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा मुहूर्त अखेर ठरला; प्रवास होणार सुखकर

Friday, 5 June 2026, 11:34

गॅसच्या टाकीत ‘पाणी’! भिगवणमध्ये ग्राहकाची फसवणूक; सिलिंडरच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Friday, 5 June 2026, 11:15
Next Post

गॅसच्या टाकीत 'पाणी'! भिगवणमध्ये ग्राहकाची फसवणूक; सिलिंडरच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.