पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानीनंतर क्राईम शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असतात.आता या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.शहर पोलिसांकडून गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे” गुगल मॅपिंग” करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात चार हजार रेकॉर्डवरील गुंडावर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील वाढत्या ‘स्ट्रीट क्राइम’ला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी योजना आखली असून, पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवरील चार हजार गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी हालचाल सुरू करण्यात आली आहे. शहरात गंभीर गुन्ह्यांत गेल्या काही महिन्यांत कमालीची घट झाली आहे. मात्र, शहरात रस्तोरस्ती ‘भाई’ निर्माण झाले असून, त्यांच्याकडून मारहाण, वाहन तोडफोड, जबरी चोरी, असे गुन्हे घडत आहेत. या गोष्टींना चाप लावण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. पोलिसांच्या डिजिटल स्ट्रॅटेजीमुळे गुन्हेगारांच्या हालचाली अधिक जवळून तपासता येणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
गुगल मॅपिंगबाबत ठळक मुद्दे –
गुन्हेगारांच्या घरांचे गुगल मॅपिंग करून त्यांच्या ठिकाणांची अचूक माहिती गोळा.
गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवणार; काय करतात, दैनंदिन हालचाली टिपणार.
गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस लक्ष ठेवणार.
‘मकोका’, ‘एमपीडीए’, गोळीबार, खून आणि खुनाच्या प्रयत्नातील गुन्हेगारांवर गुन्हे शाखा लक्ष ठेवणार.
इतर गुन्हेगारांवर स्थानिक पोलिस लक्ष ठेवणार.
गुन्हे घडत आहेत. या गोष्टींना चाप लावण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.