अजित जगताप
वडूज : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाची अखंडता व बंधुत्व कायम राखण्यासाठी संविधानाची निर्मिती केलेली आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी भारत देशाला संविधान अर्पण करून बंधुभाव जपण्याचे काम केलेले आहे. आज देशभर संविधान दिन साजरा होत आहे. खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्येही मोठ्या उत्साहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमेश शिंदे यांच्या वडूज येथील निवासस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास जगताप, कांचन जगताप, रिपब्लिकन पक्षाचे नेते अजित आण्णा कंठे तसेच पत्रकार अजित जगताप, चिरंजीव सिद्धांत जगताप, सिद्धिका जगताप यांच्या उपस्थितीमध्ये संविधानाची प्रत वाचन करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सातारा जिल्ह्यात विविध गावात संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन करण्यात आले. विविध सामाजिक संस्था तसेच विविध गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये संविधानाची बाबत आत्मचिंतन करणारी भाषणे झाली.
चौदा वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर रोजी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीर जवानांनाही अभिवादन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील जावलीचे सुपुत्र शहिद तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक जणांनी प्राणाची आहुती दिली आहे. केंडबे ता. जावली या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेट देऊन शहिद ओंबळे यांच्या नियोजित स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले.