पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडल आहे.भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. अशातच आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आपल्या पदाचा राजीनामा देताना रोहन सुरवसे पाटील यांनी असं म्हटलं की, सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्येंत मी काम केल आहे.कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जबाबदार आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अशा आशयाच मी आजवर काम करत आलो आहे. काँग्रेस हा एक विचार आहे. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्ष नेतृत्वाने करावा माझी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटले आहे.
कोण आहे रोहन सुरवसे पाटील?
काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून रोहन सुरवसे- पाटील यांची ओळख आहे. पुणे शहरात काँग्रेसच्या विविध आंदोलनात ते सक्रिय सहभाग असत. खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. त्याला समर्थन देत रोहन पाटील यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर त्यांना अटक झाली होती. तसेच जनप्रश्नावर अनेक आंदोलननात ते सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे -पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे पुण्यात काँग्रेस पक्ष आता आणखीन कमकुवत झाला आहे.