पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या चार लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या ८२ लाख २४ हजार ४२३ इतकी आहे. त्यासाठी ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असतील. तर ४४ ईव्हीएम मशीन लागणार आहेत, तसेच निवडणूकीसाठी आवश्यक मनुष्यबळ देखील सज्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त चौबे (), अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, पीएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणाले, शहरात आचारसंहिता लागू केली आहे. सर्व ठिकाणचे फलक काढण्याचे आदेश व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. तीन दिवसांमध्ये बॅनर काढले नाही तर आम्ही कारवाई करू. फलक काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करू आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करू, असा इशाराच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.
ही निवडणूक संपूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमचे प्रशासन काटेकोरपणे सर्व नियोजन करत आहे. पोलीसांनी देखील तयारी केली आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांमध्ये असलेली मतदान केंद्र, पोलीस बंदोबस्त, मतदान आणि मतमोजणीची तयारीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.