विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे)- लाखो रुपयांचा “मेडीक्लेम” असुनही हडपसरसह पुर्व हवेलीमधील बहुतांश बडी रुग्णालये मागील कांही महिण्यापासुन प्रोफेशनल, नर्सिंग, सर्व्हिस चार्जेस अशा विविध चार्जेसच्या नावाखाली रुग्णांना हजारो रुपयांचा “चुना” लावत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
रुग्णालयाने रुग्णांच्या उपचाराचे बिल लाख रुपयांचे दाखविल्यास, बहुतांश मेडीक्लेम कंपण्या रुग्णालयाने पाठवलेल्या बिलापैकी साठ ते सत्तर टक्के रक्कम मंजुर करत असल्याने, लाखो रुपयांचा मेडीक्लेम असुनही मंजुंर न झालेली तीस ते पस्तीस टक्के रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच्या खिशातुन भरावी लागत आहेत. यामुळे हडपसरसह पुर्व हवेलीमधील बहुतांश बड्या रुग्णालयांच्या बिलांचे ऑडीट त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, एकीकडे प्रोफेशनल, नर्सिंग, सर्व्हिस चार्जेस अशा विविध चार्जेसच्या नावाखाली रुग्णांना हजारो रुपयांचा चुना लावत असल्याचा आरोप होत असतानांच, दुसरीकडे अपवाद वगळता पुर्व हवेलीमधील सर्वच रुग्णालयांनी त्यांच्याच मेडीकल मधुन उपचारादरम्यान लागणारी महागडी औषधे घेण्याचे बंधणकारक केल्याचे पुढे आले आहे.
रुग्णालयाच्या बाहेर औषधांच्यावर दहा ते वीस टक्के सुट मिळत असतानांही, पुर्व हवेलीमधील बहुतांश बड्या रुग्णालयांच्या “हम करे सो कायदा” या वृत्तीमुळे गोरगरीब नागरीकांनी हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र पुर्व हवेलीत दिसुन येत आहे.
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान छोटी-मोठी अशी तीसहुन अधिक खाजगी रुग्णालये आहेत. कोरोनापुर्वी वरील सर्वच रुग्णालयात “मेडीक्लेम” असलेले रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास, संबधित रुग्णांच्या नातेवाईकांना एकुन बिलाच्या पाच ते दहा टक्के रक्कम स्वतःच्या खिशातुन भरावी लागत होती.
उर्वरीत रक्कम मेडीक्लेम कंपण्या मंजुर करत होत्या. तर कांही रुग्णालये मेडीक्लेम कंपण्यानी मंजुर न केलेली पाच ते दहा टक्के रक्कम रुग्णांना माफ करुन, रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देत होती. मात्र मागील कांही महिण्यापासुन लाखो रुपयांचा “मेडीक्लेम” असुनही रुग्णालयाने लावलेल्या एकुन बिलाच्या तीस ते पस्तीस टक्के रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतःच्या खिशातुन भरावी लागत असल्याचे पुढे आले आहे.
याबाबत मेडीक्लेम कंपण्याचे अधिकारी व मेडीक्लेम करणारे एंजट यांच्याशी संपर्क साधला असता, मागील कांही महिण्यापासुन बहुतांश रुग्णालये प्रोफेशनल, नर्सिंग, सर्व्हिस चार्जेस अशा विविध चार्जेसच्या नावाखाली हजारो रुपये बिलात वाढवत असल्याने, रुग्णांना हजारो रुपयांचा “चुना” लागत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयाचे प्रतिनिधी मात्र प्रोफेशनल, नर्सिंग, सर्व्हिस चार्जेस अशा विविध चार्जेस कसे य़ोग्य आहेत हे पटवुन देत आहेत.
कायद्यात नसतानांही औषधांची खरेदी तुमच्याच मेडीकलमधुन करण्याबाबतची सक्ती का…
हडपसरपासुन ते थेट उरुळी कांचन पर्यत असणाऱ्या बहुतांश रुग्णालयांनी मेडीकलवाल्यांच्या कडुन सहकार्याच्या बोलीवर लाखो रुपये घेऊन आपआपल्या हद्दीत मेडीकलची दुकाने चालु करण्यास परवानगी दिलेली आहे. तर दुसरीकडे रुग्ण खरेदी करत असलेल्या बिलाच्या रकमेवर रुग्णालयांना ठरावीक टक्के कमीशन द्यावे लागत असल्याची कबुली रुग्णालयाच्या हद्दीत चालत असलेल्या मेडीकल वाल्यांनी “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना दिली आहे.
यामुळे रुग्णालयात प्रवेश केल्यापासुन ते उपचारहोऊन रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर पडेपर्यंत लागणारी सर्व प्रकारची औषधे रुग्णालय सांगेल त्या मेडीकलमधुनच खरेदी करावी लागत आहेत. रुग्णालयापासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मेडीकलमध्ये औषधांच्यावर दहा ते वीस टक्के सुट मिळत असतानांही, पुर्व हवेलीमधील बहुतांश बड्या रुग्णालयांच्या “हम करे सो कायदा” या वृत्तीमुळे गोरगरीब नागरीकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र पुर्व हवेलीत दिसुन येत आहे.
तर तुमचा रुग्ण हलवा…
पुर्व हवेलीमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी संबधित रुग्णालयाच्या व्यवस्थापणाकडे बाहेरुन औषधे आनता येतील का अशी विचारणा केली असता, रुग्णालयाच्या व्यवस्थापणाने बाहेरुन औषधे आणणार असाल तर रुग्ण आमच्या येथुन हलवा असा उर्मट एसएमएस रुग्णालयाच्या नातेवाईकाला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसापुर्वी घडल्याचे पुढे आले आहे. वास्तविक संबधित रुग्णाच्या नातेवाईकांचे मेडीकल असल्याने व रुग्णाची परीस्थिती गरीब असल्याने, रुग्णाच्या नातेवाईकांनी संबधित रुग्णालयाच्या व्यवस्थापणाकडे बाहेरुन औषधे आनता येतील का अशी विचारणा केली होती.
बाहेरुन औषधे आणणार असाल तर रुग्ण आमच्या येथुन हलवा असा उर्मट एसएमएस मिळताच, रुग्णाच्या नातेवाईकांनी तात्काळ रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलविला. रुग्ण हलविला असला तरी, कायद्यात नसतानांही औषधांची खरेदी तुमच्याच मेडीकलमधुन करण्याबाबतची सक्ती का असा प्रश्न नातेवाईकांना छळत आहे. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याची माहिती “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे.