राहुल अवचट
यवत : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कासुर्डी टोल नाका येथे कार व टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात कारचा चक्का सुरू झालेला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कासुर्डी टोल नाक्याजवळ सोलापूर कडून पुणे दिशेकडे जाणाऱ्या ट्रकचा व कारचा सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला आहे.अपघातात कारचा चक्काचूर झालेला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.कारमधील चौघे प्रवासी सुखरूप आहेत.कासुर्डी टोल नाका परिसरात वारंवारच अपघात घडत असून महामार्ग प्रशासन व संबंधित प्रशासनाने याची त्वरित दक्षता घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.