मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. करावेत.या महानगरपालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार १०वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ही भरती ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. प्रोग्राम कोऑर्डिनेटर पदासाठी MBBS/BHMS/BDS पदवी प्राप्त केलेली असावी. डाएटिशियन पदासाठी B.sc आणि Nutrition And Diabetes मध्ये डिप्लोमा, ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स केलेले असावे. याचसोबत एम-एस सीआयटी केलेले असावे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी वाणिज्य, कला किंवा विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत टायपिंगचा कोर्स केलेला असावा.
डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावे.MPW (NCD) कॉर्नर पदासाठी १०वीची परीक्षा प्राप्त केलेली असावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ११५ रिक्त पदांसाठी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मेल करुन अप्लाय करु शकतात. ६ मे २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे