राहुलकुमार अवचट
यवत :Breaking News – तीन मुली झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Breaking News) ही घटना दौंड तालुक्यातील खोर येथील पाटील वस्ती येथे घडली. (Breaking News)
आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव काय
अश्विनी योगेश चौधरी (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृत आश्विनी चौधरी यांचा भाऊ संदेश जयसिंग काळकुटे (रा.वाडेबोल्हाई ता. हवेली) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासू, सासरे, व पतीच्या शारीरिक व मानसीक छळ करत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. २००४ मध्ये योगेश ज्ञानदेव चौधरी याच्याशी लग्न झाले होते.
लग्नानंतर नवरा योगेश ज्ञानदेव चौधरी, सासु मंदा ज्ञानदेव चौधरी व सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी (सर्व रा.पाटीलवस्ती खोर ता.दौंड जि.पुणे) यांनी घरातील प्रापंचिक कारणावरून, तुला तीन मुली झाल्या, तु तुझे कानातील हरवले आहे, अशा कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसीक त्रास देवुन शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करत होते. त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मदने करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
दौंड तालुक्यातील पारगाव येथील दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल ; कारण अस्पष्ट…!