Big News : पुणे : तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्र्यांवर येरवडा येथील तीन एकर जमीन एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असा अजित पवार यांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बोरवणकर यांनी पुस्तकात केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. तर लिलावाच्या निर्णयाला आपण त्यावेळी विरोध केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने केले अजित पवार यांना लक्ष्य
मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे. या पुस्तकात म्हटल्यानुसार, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतला. एके दिवशी मला विभागीय आयुक्तांचा फोन आला. पुण्याच्या पालकमंत्र्यांना तुम्हाला भेटायचे आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय आहे. मी विभागीय कार्यालयातच पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा त्यांच्याकडे होता. त्यांनी मला सांगितले की, या जागेचा लिलाव झाला आहे. (Big News) जास्त बोली लावणाऱ्यांसोबत तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना म्हटले, येरवडा पुणे येथील मध्यवर्ती ठिकाण आहे. भविष्यात अशी जागा मिळणार नाही. मी नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मी सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. पण त्या मंत्र्यांनी माझे काहीच ऐकले नाही आणि जमीन हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला.
दरम्यान, या पुस्तकानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अजित पवार यांना घेरण्यात आले आहे. तर अजित पवार यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी करणार 1.25 लाख कोटींची गुंतवणूक
Big News : मोबाईल निर्यातीत झाली दुपटीने वाढ; आयफोनचा निम्म्याहून अधिक वाटा
Big News : जागतिक पातळीवरील महागाईचा धोका; खाद्यवस्तूंसह इंधन दरवाढीचे बसणार चटके?