पुणे : पुणे विभागातील वाल्हा ते नीरा दरम्यान दुहेरी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६, १६, १७ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे-फलटण-पुणे ही रेल्वे गाडी ४ ते २३ ऑक्टोबर दरम्यान लोणंद-फलटण- लोणंद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर, याच काळात पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस ही कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर दरम्यान चालणार आहे. २० ऑक्टोबर रोजी सुटणारी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही सायंकाळी ७ वाजता सुटेल.
दरम्यान, २० ऑक्टोबर रोजी यशवंतपूर वरून सुटणारी यशवंतपूर चंदीगड एक्सप्रेस व हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्सप्रेस मिरज, कुर्डूवाडी, दौंड या मार्गावरून जातील. ४ ते २३ ऑक्टोबर हुबळी दादर एक्स्प्रेस ही देखील मिरज, कुर्डूवाडी, दौंड या मार्गे धावणार आहे.