Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आता तरी जागा द्या ; उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा सवाल ; प्रशासन सहकार्याला तयार, मग देवस्थान ट्रस्टची दिरंगाई कशासाठी?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 19 August 2026, 16:49

उरुळी कांचन : येथील दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर आता ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. वाढती लोकसंख्या, मोठी बाजारपेठ आणि रोजची प्रचंड वर्दळ यामुळे गावात कचऱ्याचे डोंगर साचत असून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 3 एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

प्रशासन सहकार्यास तयार आहे, ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे आणि ग्रामसभेनेही ठराव मंजूर केला आहे; मग तरीही देवस्थान ट्रस्ट जागा देण्याबाबत ठोस निर्णय का घेत नाही? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार गावात दररोज सुमारे 7 ते 11 टन कचरा निर्माण होतो. सध्या उपलब्ध असलेल्या अपुऱ्या जागेत कचरा साठवला जात असला, तरी ही व्यवस्था भविष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे.

या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी कायमस्वरूपी अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे. उरुळी कांचनमध्ये हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ‘ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन’ अत्यंत आग्रही असून सातत्याने पाठपुरावा करत आहे.

जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराच्या व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली होती की, “केवळ जागेचा प्रश्न मार्गी लावा, प्रकल्पासाठी निधी आणि प्रशासकीय सहकार्य देण्यास जिल्हा परिषद पूर्णपणे तयार आहे.”

 

जिल्हा परिषद प्रशासन निधी व तांत्रिक सहकार्य देण्यास तयार आहे, ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर सोपस्कार आणि ग्रामसभेचा ठराव पूर्ण केला आहे, तरीही देवस्थान ट्रस्टकडून जागा देण्याबाबत अपेक्षित निर्णय अद्याप का प्रलंबित आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. देवस्थान हे गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी असते. कचऱ्याच्या समस्येने उरुळी कांचनचे आरोग्य धोक्यात आले असताना, देवस्थान ट्रस्टने 3 एकर जागा देण्यास उशीर का करावा? विश्वस्तांनी आता तरी भूमिका स्पष्ट करून उरुळी कांचनकरांना दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, एकीकडे गाव कचऱ्याच्या दुर्गंधीत आणि घाणीच्या साम्राज्यात सापडले असताना, दुसरीकडे जागेअभावी एवढा महत्त्वाचा प्रकल्प रखडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन जागेचा निर्णय घेऊन कचरा प्रकल्पाला मदत करावी अशी मागणी जोर धरू लगली आहे.

याबाबत देवस्थान ट्रस्टचे खजिनदार युवराज बाप्पू कांचन म्हणाले, “ग्रामसभेला मी स्वतः हजर राहिलो होतो . यावेळी ग्रामपंचायतीने पत्र दिले आहे. याबाबत लवकरच देवस्थान ट्रस्टची मिटिंग घेण्यात येणार असून या मिटिंगमध्ये चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री तिकिट केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार; 4.91 लाखांचा मुद्देमाल लंपास..

Wednesday, 19 August 2026, 19:04

तुकाराम मुंढेंचा गुळ व्यापाऱ्यांना दणका! वसंतदादा मार्केट यार्डात धाड; ४ लाखांचा संशयास्पद गुळ जप्त

Wednesday, 19 August 2026, 18:51

जात जिंकली, प्रेम हरलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाचं टोकाचं पाऊल; तलावात सापडले मृतदेह

Wednesday, 19 August 2026, 18:43

श्री संत सावता महाराज पालखी सोहळ्याचे इंदापुरात उत्साहात स्वागत

Wednesday, 19 August 2026, 18:40

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही कर्जाचा बोजा नाही! वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 19 August 2026, 18:10

चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला अतिशहाणपणा भोवला! ‘बघा मी CCTV मध्ये दिसतोय म्हणाला अन् बिंग फुटलं

Wednesday, 19 August 2026, 18:07
Next Post

नववीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग; तिघांकडून लगट करण्याचा प्रयत्न, उरुळी कांचन पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.