Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 11 September 2026, 17:44

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापलेले असताना आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच १२ सप्टेंबरनंतर मुंबईकडे जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी ही याचिका दाखल केली होती. आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मागील वर्षीच्या आंदोलनाचा दाखला देत याचिकाकर्त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. मागील आंदोलनावेळी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश न्यायालयाला द्यावे लागल्याचेही याचिकाकर्त्यांनी सांगितले.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केवळ मागील वेळी परिस्थिती निर्माण झाली होती, या आधारावर यावेळी आंदोलनाला मनाई करता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने घेतली. आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

 

या निर्णयामुळे जरांगे पाटील यांचे पुढील आंदोलन मुंबईत होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणासह इतर प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींवर संबंधित यंत्रणांचे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघतो का आणि जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होतात का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12
Next Post

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका 'महत्त्वाच्या' परवानगीची प्रतीक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp