Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 12 September 2026, 11:53

बारामती : घरातील काही कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घरातून निघालेली एक तरुणी अखेर सुरक्षितपणे घरी परतली. बारामती शहर पोलिसांच्या विशेष मिसिंग पथकाने तिचा शोध घेतल्यानंतर महिला पोलिसांनी संवेदनशीलपणे संवाद साधला. या चौकशीत तरुणीवर दबाव आणून तिला कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली.

तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार 10 सप्टेंबर रोजी पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्ष मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाने तरुणीचा शोध घेतला. मात्र, ती घरातून नेमकी कोणत्या कारणामुळे बाहेर पडली आणि तिची सुरक्षितता किती आहे, याचा तपास करणेही पोलिसांसाठी महत्त्वाचे होते.

मिसिंग पथकातील महिला पोलीस हवालदार मोनिका मोहिते आणि ज्योती डिसले यांनी तरुणीशी शांतपणे संवाद साधला. कोणताही दबाव न आणता तिची बाजू समजून घेतल्यानंतर काही गंभीर बाबी समोर आल्या. कुटुंबाच्या ओळखीतील एका व्यक्तीने तिच्याशी जवळीक वाढवून स्वतंत्र मोबाईल दिल्याचे तिने सांगितले. त्यानंतर फोन आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क ठेवत तिच्या वैयक्तिक छायाचित्रांचा गैरवापर करण्याची धमकी दिल्याची माहितीही तिने पोलिसांना दिली.

तसेच, सामाजिक संघटनेशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या आणखी एका तरुणाने मदतीच्या नावाखाली तिच्याशी संपर्क वाढवला. संरक्षण देण्याचे आश्वासन देत त्याने प्रेम व्यक्त करून लग्नाचे आश्वासन दिल्याचेही चौकशीत समोर आले.

 

आई-वडिलांनीही मुलीवर कोणताही दबाव न आणता तिच्याशी शांतपणे वागावे, अशी पोलिसांनी सूचना केली. त्यानंतर बराच वेळ झालेल्या संवादात तरुणीने अखेर स्वतःच निर्णय घेतला आणि आई-वडिलांसोबत घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मुलगी सुरक्षित परतल्याचे पाहताच चिंतेत असलेल्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महिला पोलीस, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि विधिज्ञ यांच्या उपस्थितीत तरुणीची बाजू स्वतंत्रपणे ऐकून घेण्यात आली. या प्रकरणात संभाव्य गैरफायदा वेळीच लक्षात आल्याने पुढील धोका टळल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp