Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 12 September 2026, 11:49

पुणे, ता. 12 : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि इतर जिल्ह्यांतून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तपास पथकाने विधीसंघर्षित बालकासह एका आरोपीला ताब्यात घेतले असून, एकाला अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 10 लाख रुपये किमतीच्या 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कृष्णा चंद्रकांत शेळके (वय 26, रा.अहमदपूर लातूर) असे अटक आलेल्या आरोपीचे नाव आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन पेठ येथून होंडा शाईन दुचाकी (एमएच 37 एबी 3872) चोरीला गेल्यानंतर वाहनमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांनी पथकासह गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना दोन संशयित दुचाकीचोर नारायण पेठ परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. दोन संशयित मुले आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून पसार झाला; मात्र दुसऱ्या संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान तो विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने साथीदाराच्या मदतीने पुणे व इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात चोरीच्या दुचाकींपैकी दोन दुचाकी अहमदपूर, लातूर येथील कृष्णा शेळके याला विकल्याचे समोर आले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी लातूर येथे जाऊन शेळके याला ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात अटक केली.

12 गुन्ह्यांचा छडा

 

पोलिसांच्या तपासात आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले. याशिवाय समर्थ, हडपसर, भारती विद्यापीठ, विमानतळ आणि काळेवाडी पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक, असे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच इतर जिल्ह्यांतील 5 वाहनचोरीचे गुन्हेही उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 12 गुन्ह्यांचा छडा लावण्यात तपास पथकाला यश आले आहे. आणखी दोन दुचाकींच्या चोरीबाबत तपास सुरू आहे.

10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

विधीसंघर्षित बालक आणि त्याच्या साथीदारांकडून विविध कंपन्यांच्या 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची अंदाजे किंमत 10 लाख रुपये आहे. वाहनचोरीतील आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू असून, या टोळीशी संबंधित आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त कृषीकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक, गुन्हे, विकास भिंगारदिवे व रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उप निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, पोलीस हवालदार नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड, उमेश गव्हाणे यांच्या पथकाने केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41
Next Post

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp