Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 11 September 2026, 17:34

लोणी काळभोर, ता.11 : आगामी काळात उत्साहात साजरा होणा-या गणेशोत्सवा दरम्यान गणेश मंडळांना येणा-या संभाव्य अडचणीं संदर्भात पोलीस प्रशासन इतर शासकीय खात्यां बरोबर समन्वय साधून प्रत्येक ठिकाणी भेट देणार आहे. या भेटीनंतर गणेश मंडळांनी सांगितलेल्या सर्व अडचणी दूर झालेल्या असतील असे प्रतिपादन पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी केले.

आगामी काळात साजरा होणारा गणेशोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने परिमंडळ ६ मधील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला दक्षता समिती, शांतता समिती, विघ्नहर्ता न्यास समितीचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींचे प्रशासकीय अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपायुक्त जीवन बेनिवाल बोलत होते.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, अतुलकुमार नवगीरे, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, हडपसरचे हेमंत पाटील, काळे पडळच्या गिरीषा निंबाळकर, मांजरीचे बाबासाहेब निकम आणि मुंढव्याच्या स्मिता वासनिक, नगरसेवक मारुती आबा तुपे, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ शंतनू जगदाळे, समन्वयक सलीम शेख यांच्यासह पोलीस व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जीवन बेनिवाल पुढे म्हणाले गणेशोत्सवात काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. वाहतूक विभागाच्या उपायुक्तांशी चर्चा करून, संबंधित ठिकाणचे प्रशासकीय आधिकारी यांच्यासह त्या ठिकाणी भेट देऊन वाहतूक कोंडीतून मार्ग काढला जाईल. डीजे वापरण्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्व गणेश मंडळांनी पालन करावे. ध्वनिप्रदूषण होऊन लहान मुलं, वयोवृद्ध व इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची गणेश मंडळांनी काळजी घ्यावी. पोलीस खात्याकडून विनाकारण कुणालाही त्रास दिला जाणार नाही. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न पोलीस करतील. या कामी सर्वांनी मदत करावी. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा असे प्रतिपादन जीवन बेनिवाल यांनी केले.

 

या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, ध्वनी प्रदूषण, मिरवणूक, वाहतूक व्यवस्था, विसर्जन व्यवस्था व इतर महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत वाहतूक विभागासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळातील वाहतूक नियोजन, मिरवणुका, सुरक्षा व्यवस्था, परवाना, कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील प्रश्न, अडचणी आणि सूचना पोलिस प्रशासनासमोर मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत आवश्यक सूचना दिल्या. गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम करून उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41
Next Post

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp