Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 11 September 2026, 16:55

दौंड, ता. 11 : वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली विमा कंपनीकडे बनावट वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक आणि संशयास्पद कागदपत्रे सादर करून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलशी संबंधित तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अभिजित शशिकांत मोरे (वय 42, शाखा व्यवस्थापक, बजाज जनरल इन्शुरन्स) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. विशाल गोविंद मिसाळ, माधुरी विशाल मिसाळ आणि संकेत राजू होले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत होले यांनी जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दौंड येथे 13 ते 19 जुलै 2024 या कालावधीत उपचार घेतल्याचा दावा करत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता.

या दाव्याच्या पडताळणीदरम्यान विमा कंपनीला संशयास्पद बाबी आढळल्याने सखोल तपास करण्यात आला. विमा दाव्यासोबत डॉ. माधुरी बहिरवाडे यांच्या नावाचा पॅथॉलॉजी अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालावर डॉक्टरांचा शिक्का व स्वाक्षरी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यावरील वैद्यकीय नोंदणी क्रमांकाची अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी केली असता सदर नोंदणी क्रमांक डॉ. माधुरी बहिरवाडे यांच्या नावावर नसल्याचे समोर आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर संबंधित प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यावर अमोल झिपारे या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाची नोंदणी आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे.विमा दाव्यासोबत सादर करण्यात आलेल्या आधारकार्डाचीही पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये नाव आणि जन्मतारखेबाबत वेगळी माहिती आढळून आली, तर अधिकृत नोंदणीच्या तपासणीत डॉ. माधुरी विशाल मिसाळ यांचे नाव आणि वेगळी जन्मतारीख आढळल्याचा दावा विमा कंपनीने केला आहे.या सर्व बाबींवरून बनावट कागदपत्रे, दुसऱ्या डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकाचा कथित गैरवापर आणि खोटी ओळख दाखवून विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

डॉ. विशाल मिसाळ, माधुरी मिसाळ आणि विमाधारक संकेत होले यांनी संगनमत करून असत्य व संशयास्पद वैद्यकीय अहवाल, ओळखपत्रे आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा आरोप विमा कंपनीने केला आहे. या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. विमा कंपनीने संशय आल्याने संबंधित दावा रद्द केला असून, या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 318(4), 316(2), 336(3), 319(2), 340(2), आणि 61 अन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हवालदार अमीर शेख करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post

कोरेगाव पार्कच्या 'सैराट बिर्याणी'सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp