गणेश सूळ
Ahilyabai Holkar Jayanti : केडगाव : एक महान योध्दा…. कुशल राजनितिज्ञ … प्रभावशाली शासक महाराणी म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची एक ओळख आहे. उद्या ३१ मे रोजी त्यांची जयंती आहे. त्यांच्या कार्याची यशोगाथा व धावता आढावा आज आपण जाणून घेऊयात… (A great warrior… a skilled statesman… the success story of influential ruler Maharani Punyashlok Ahilyabai Holkar)
कार्याची यशोगाथा व धावता आढावा…
कुशल, शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ ला चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) या गावी झाला. चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांची लाडकी कन्या अहिल्याबाई ! ज्या काळात महिलांना घराचा उंबरा ओलांडण्याची परवानगी नव्हती.(Ahilyabai Holkar Jayanti) त्या काळात माणकोजी शिंदेनी आपल्या अहीलेला शिक्षणाची गोडी लावली.
अहील्याचे माता पिता ईश्वरभक्त होते. त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर अध्यात्माचे संस्कार झाले. अहिल्या महादेवाची भक्त होती. इतर मुली भातुकली खेळत असताना ती मात्र वाळूचे शिवलिंग बनवून बेलभंडारा उधळत असे. अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिमेने त्या पुढे अवघ्या विश्वाकरिता एक आदर्श ठरल्या. (Ahilyabai Holkar Jayanti) बालपणापासूनच अहिल्याबाई यांच्यामध्ये दया, परोपकार,प्रेम ,सेवाभाव या भावना उपजतच होत्या. अशी संस्कारित सुकन्या तत्कालीन परंपरेनुसार होळकर घराण्याची सून झाली.
अहिल्याबाईचा विवाह मल्हारराव होळकर याचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न झाला. अध्यातमाबरोबरच शास्त्र, शस्त्र यांचे प्रशिक्षण घेऊ लागल्या. त्यांची जिज्ञासू वृत्ती हेरून मल्हारराव होळकर यांनी त्यांना राजकारणात सक्रिय ठेवण्यास सुरुवात केली. (Ahilyabai Holkar Jayanti) अहिल्याबाईचा संसार बहरला त्यांना पुत्र प्राप्ती झाली. मालेराव आणि मुक्ता अशी दोन अपत्य झाली.
कुंभेर येथे झालेल्या युद्धात खंडेराव यांना वीरमरण….
अहिल्याबाई पतीला युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी सतत प्रोत्साहित करीत असे. खंडेराव स्वतः युद्धनिपुण होते. सर्व काही सुरळीत असताना एक दिवस कुंभेर येथे झालेल्या युद्धात खंडेराव यांना वीरमरण आले. (Ahilyabai Holkar Jayanti) अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
तत्कालीन परंपरेनुसार त्या सती जाऊ लागल्या तेव्हा त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना विनवत म्हटले की माझी सून गेली आहे. (Ahilyabai Holkar Jayanti) माझा खंडेराव माझ्या समोर उभा आहे असे मी समजतो .हे होळकर साम्राज्य तुला सांभाळायचे आहे. प्रजेला अनाथ करून जाऊ नकोस सती जाण्याचा निर्णय रद्द कर! आपल्या पितासमान आणि गुरुस्थानी असलेल्या सासऱ्याची आज्ञा मानून सती जाण्याचा निर्णय रद्द केला.
काही दिवसातच सर्व राज्यकारभार अहिल्याबाईंच्या हाती सोपवून मल्हारराव होळकर हे देखील जग सोडून गेले. अहिल्याबाईंना अतिशय दुःख झाले. तरी देखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जबाबदारी अहिल्याबाई च्या नेतृत्वात चिरंजीव मालेराव यांनी आपल्या हातात घेतली. (Ahilyabai Holkar Jayanti) तोच काही काळात त्यांना पुत्रवियोगही सहन करावा लागला. आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला नंतर या वयक्तिक दुःखाचा प्रभाव त्यांनी प्रजेवर पडू दिला नाही.
अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याच्यातील अद्भुत शक्ती पराक्रम पाहता प्रजा त्याच्या कार्यावर विश्वास ठेऊ लागली. त्यांनी मल्हाररावाचे दत्तक पुत्र तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून घोषित केले. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईनी अनेकदा युध्दात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचा कुशल नेतृत्व केले. (Ahilyabai Holkar Jayanti)
अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वस्थामुळे देवआज्ञा…
राज्यातील चोरी, लूट अशा घटनावर अंकुश आणण्यात यश मिळवले. त्यांनी पुरातन मंदिराची डागडुजी केली, जीर्णोध्दार केला, नद्यावर घट बांधले, न्यायालये उभारली, अन्नछत्रे सुरू केली. पूजापाठ, वेदपठण, वेदाध्ययन यास प्रोत्साहन दिले.(Ahilyabai Holkar Jayanti) मुख्य म्हणजे हे सर्व स्वखर्चातून करून त्यांनी आपल्या संपत्तीचे दान केले व वैरागी आयुष्य निवडले. आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वस्थामुळे देवआज्ञा झाली.
दरम्यान, एक महिला सांसारिक दुःखाचे हाल पचवुन स्वच्छ चारित्र्याचे आदर्श राजकारणाला परिपाठ घालून देते, तेव्हा ती ‘पुण्यश्लोक ‘पदाला पोहचते . (Ahilyabai Holkar Jayanti) अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन!
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तरुणाने थेट पोलीसाच्या मारली कानशिलात…
Pune News : स्पीकरवरुन झालेल्या वादातून अपमानित झाल्याने एका 70 वर्षीय नागिरकाने केली आत्महत्या