Pune Crime | पुणे : पुणे शहरात सद्या हेल्मेट सक्तीचा विषय चर्चेत आहे. पुणेकर आणि हेल्मेट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. एकवेळ कारवाईला सामोरे जाऊ पण हेल्मेट घालणार नाही अशी काही परिस्थीती पुण्यात आहे. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी विना हेल्मेट वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाई दरम्यान एकास पोलीसांनी पोलीस ठाण्यात आणले असता त्याने तेथे मैत्रिणीला बोलावून घेत पोलीसांसोबत वाद घालत पोलीसाच्या कानशिलात मारली. हा प्रकार पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात २८ मे रोजी रात्री पावणेबारा वाजता घडला.
याप्रकरणी सहायक फौजदार रामदास बांदल (वय ५७) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीसांनी गौरव हरीष वालावकर (वय २९) आणि सुचेता चेतन घुले (वय २८, दोघे रा. चिंतामणी रेसिडेन्सी, बिबवेवाडी) यांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ मे रोजी विमल विहार सोसायटीजवळ पोलीसांनी नाकाबंदी लावली होती. त्यावेळी तक्रारदार सहायक पोलीस निरिक्षक बरडे व इतर सहकारी हे नाकाबंदी करत होते.
कागदपत्रे न दाखवता पोलीसांची हुज्जत…
दरम्यान आरोपी गौरव हा विमा हेल्मेट दुचाकीवरून जात होता. तेव्हा त्याला पोलीसांनी अडवले व वाहनाची कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. त्याने कोणतीही कागदपत्रे न दाखवता पोलीसांची हुज्जत घातली व सुचेता घुले हिला बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणल्यावर गौरव याने अचानक तक्रारदार पोलीसाच्या कानशिलात लावली व काय करायचे ते करा असे म्हणाला.
दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!