पुणे : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पुण्यातील पिरंगूटमधील स्थानिक मुस्लिमांना एक ठराव मंजूर केला आहे. या ठरावानुसार, स्थानिक मुस्लिम वगळता, इतर मुस्लिमांना मशिदीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरक्षेच्या दृष्टीने पिरंगुट स्थानिक मुस्लीम बांधव वगळता परप्रांतिय, व्यवसायानिमित्त पंचक्रोशी आणि आजूबाजूच्या गावातील मुस्लीम बांधवांना मशिदीत प्रवेश करण्यास आणि प्रार्थनेसाठी येण्यास बंदी घालण्यात आली आहे.ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीदरम्यान विशेष सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, गावातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी तसेच मशिदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरील बांधवांचा अनावश्यक भार टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
पिरंगुटच्या ग्रामपंचायतीने ठरावाच्या खाली समस्त गावकरींचा उल्लेख केला असून, हा निर्णय ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये घेतलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.