पुणे : कोण? कधी? कोठे? आणि कसा वेळेचा उपयोग करेल, ते कधीच कोणाला सांगता येत नाही. परंतु, एका भारतीयाने लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करून चक्क स्वत: विमान बनविले आहे. आणि या विमानातून त्याने कुटुंबासोबत संपूर्ण ब्रिटनचा यशस्वी प्रवास केला आहे.
अशोक थामरक्षण असे (मूळ गाव केरळ) असे विमान बनविणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सद्या ते लंडन मध्ये राहत आहेत. त्यांनी लॉकडाऊनमध्य वेळेचा सदुपयोग करत घरच्या घरी स्वत:च्या हाताने एक ४ सीटर ( चार आसनी) विमान तयार केले आहे. त्यासाठी त्यांना तब्बल १८ महिन्यांच्या कालावधी लागला आहे. तसेच ते विमान बनविण्यासाठी सुमारे १.८ कोटी रुपये खर्च लागला आहे.
अशोक थामरक्षण यांनी पलक्कड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मास्टर्सचे शिक्षण युकेमधून पूर्ण केले आहे. सध्या ते फोर्ड मोटर कंपनीत कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या वेळेत जोहान्सबर्गमधील स्लिंग एअरक्राफ्ट या कंपनीबद्दल माहिती मिळाली. कंपनी २०१८ साली ते Sling TSI विमान लॉंच करणार होते. अशोक यांनी त्या कंपनीला भेट देऊन विमानाचा संपूर्ण अभ्यास केला. लंडनमध्ये घरी आल्यावर त्यांनी विमान तयार करण्यासाठी किट मागवले. घरीच वर्कशॉप तयार करून त्यांनी विमान तयार केले.
दरम्यान, विमान तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी संपूर्ण प्रकल्पावर लक्ष ठेवून होते. ब्रिटनमध्ये अशा होम-मेड विमानांची कल्पना नवी नाही. विमानसाठीचे असेंब्ली किट पुरवणाऱ्या अनेक कंपन्या येथे आहेत, असे अशोक यांनी सांगितले आहे.
या विमानाचा वेग २०० किमी प्रतितास असून इंधन टाकी १८० लिटर क्षमतेची आहे. उड्डाणासाठी ताशी सुमारे २० लिटर इंधन लागते. अशोक यांची छोटी मुलगी दिया हिच्या नावावरून त्यांनी या विमानाचे G-Diya असे नाव ठेवले आहे. त्यांनी या विमानातून कुटुंबासह संपूर्ण ब्रिटनचा प्रवास केला. पत्नी व मुलींसह ते जर्मनी, ऑस्ट्रिया आणि झेक रिपब्लिक येथेही फिरून आले आहेत.