Aashadi Wari यवत : संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखीचे आज यवतकरांचा निरोप घेत पंढरपूरकडे प्रस्थान झाले. (Aashadi Wari) बोरीऐंदी येथील मुक्कमानंतर पालखी सोहळा रात्री यवत येथे विसावला, पहाटे श्री काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक, महापूजा व विविध धार्मिक विधींसह आरती संपन्न झाली यवत ग्रामप्रदक्षिणा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळ पालखी रथामध्ये विराजमान करण्यात आली. (Aashadi Wari) यावेळी कुलदीप फरतडे आणि मित्र परिवार यांच्यावतीने चहा-नाश्ता वाटप करण्यात आले. (Aashadi Wari)
हातात भगव्या पताका, कपाळी टिळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचा नामाचा जयघोष, निवृत्ती- ज्ञानदेव-सोपान- मुक्ताबाई- एकनाथ- नामदेव- तुकाराम संतांचा गजर करत सकाळी ०८.३० च्या सुमारास यवतकरांचा निरोप घेत संत चांगावटेश्वर महाराज पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. इरिगेशन कॉलनी जवळ विठ्ठल चहा येथे राजगुरू परिवार यांच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले.
यावेळी ह.भ.प नाना महाराज दोरगे, गणेश शेळके, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे, कैलास दोरगे, चंद्रकांत दोरगे,अशोक दोरगे,संदीप राजगुरु , शैलेश गुंजभारे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ९ च्या सुमारास पालखीचे भांडगाव हद्दीत प्रवेश केला. एवढी भांडगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
पालखीचा आजचा मुक्काम श्री नागेश्वर मंदिर पाटस येथे असून रावणगाव शेटफळगडे, भिगवन, दाळज नंबर १, इंदापूर असे मुक्काम करीत सराटी येथे नीरा नदीवर श्रींचे गंगास्थान होऊन पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. बुधवार दि. २८ जून रोजी पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असुन दि.२९ रोजी नगर प्रदक्षिणा व श्रींचे चंद्रभागा स्थान होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प जनार्दन महाराज वाबळे व मुख्य चोपदार ह.भ.प शशिकांत महाराज जगताप यांनी दिली.