अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील हुतात्मा नगरी तसेच सार्वजनिक उत्सवात स्वतःला झोकून देणारे सर्वधर्मीय कार्यकर्ते आहेत.त्यांच्या सहभागामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात नंतर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.दोन वर्षांच्या कॊरोना काळात संकट आले होते. ते दूर झाल्याने सर्वांनीच पावसाची तमा न बाळगता नऊ दिवस नवलाईने सण साजरा केला आहे.
कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व सार्वजनिक कार्यात वडूजकर नागरिक बहुसंख्येने सहभागी होताना दिसत आहेत. धार्मिक व विधायक उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंड आहे.जे येतील त्यांना सोबत व जे येणार नाहीत त्यांना बाजूला सारून कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करून दाखवितात. अवघे विश्वाच माझे घर असे समजून एकोपा दाखविला जातो. रक्तदान , आरोग्य शिबीरे,स्वच्छता मोहीम किंवा वृक्षारोपण कार्यक्रमात अनेकजण योगदान देताना दिसत आहेत. त्याच बरोबर कायदा व सुव्यवस्था राखली जाते. त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडत नाहीत.
वडूज नगरीतील भाग्योदय मित्र मंडळ, कर्मवीर मंडळ ,विट्टल नगर,नवतरुण दुर्गा माता भवानी माता (कोळी वस्ती),जाधव वस्ती (निसलबेंद)शिवाई ग्रुप, रणवीर दुर्गा माता मंडळ, शेतकरी दुर्गामाता मंडळ, जय अंबे दुर्गा माता मंडळ, युवा चैतन्य दुर्गा माता मंडळ, एन जी पार्क, शारदा नवरात्रोत्सव मंडळ, पंत नगर, आदिशक्ती दुर्गा माता मंदिर आदी ठिकाणी पूजा, आरती, गरब्याचा जल्लोष, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे खेळ, होम मिनिस्टर रंगतदार स्पर्धा, बक्षिसे, हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाले आहेत. तसेच विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आरती, श्री ची मूर्ती भेट, देणगी व महाप्रसाद यामुळे खऱ्या अर्थाने समतेची गुढी उभारल्याचे चित्र निर्माण झाले.
राजकीय मुकुट बाजूला ठेवून वडूज परिसरात सर्वजण एकदिलाने व एका विचाराने सहकार्य करीत होते. विविध मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व त्यांचे कुटूंब यांचे व्यक्तिगत पातळीवर योगदान सुध्दा पाहण्यास मिळाले. आवर्जून उल्लेख करावा असे आदरणीय वडूज नगरीच्या नगराध्यक्षा सौ मनिषा काळे,उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, सर्व आजी- माजी नगरसेविका, मंडळाचे हितचिंतक डॉ महेश गुरव,शहाजीराजे गोडसे, अनिल माळी,विजय शिंदे, अमोल गोडसे,तुषार बैले,जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत पाटोळे,महेश गोडसे, प्रसाद जगदाळे, प्रतिक बडेकर, श्रीकांत काळे, गणेश गोडसे,देवानंद थोरात, कृणाल गडांकुश,शुभम रामगुडे, सुरज पोतदार, सुरज लोहार, वैभव फडतरे, ऋषी लोहार, तेजस जगताप,धनंजय वायदंडे,आकाश जाधव, काका बनसोडे, गणेश गोडसे, इमरान बागवान,प्रशांत राऊत,विजय शेटे,राहुल घोरपडे, चंद्रकात कोकाटे, चांद सय्यद, वैभव लोहार,वैभव फडतरे,अनिकेत दिघे तसेच अनेक मान्यवरांनी व होमगार्ड, वडूज पोलीस ठाण्याचे स. पो. नि. मालोजीराव देशमुख व त्यांचे सर्व सहकारी ,विविध विभागाचे शासकीय अधिकारी,वडूज नगरपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, कोरोना संकटाने तावून सलाखून निघालेल्या वडुजकरांनी दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मनमुराद आनंद घेऊन धार्मिक कार्यक्रम सादर केल्याचे दिसून आले आहे. अनेक मान्यवरांनी आरती निमित्त मंडळाच्या श्री मूर्तीला भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच महाप्रसाद वाटप करून तृप्तीचे ढेकर सुध्दा दिले.यावेळी नगरसेवक ओंकार चव्हाण यांची चिमुकली कन्या त्रिशाखा हीच देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध मंडळाच्या ‘श्री’ च्या मूर्तीचे मनोभावे पूजा करून युवा नेते सुरेंद्र गुदगे, सौ सोनिया जयकुमार गोरे,संदीप मांडवे, धनंजय चव्हाण, विकास काळे, पत्रकार धनंजय क्षिरसागर, अजित जगताप,निलेश कणसे,शरद कदम,आकाश यादव, नितीन राऊत व सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे,सतिश साठे व इतर कार्यकर्त्यानी विविध मंडळाला भेट देऊन श्री चे दर्शन घेतले.