Aadhaar Card Rule Change : आधार कार्ड हे प्रत्येक माणसांचा आधार बनलं आहे. आर्थिक, शासकीय अथवा इतर कोणत्याही ठिकाणी तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. आधारकार्ड तयार करण्यासाठी फिंगरप्रिंटची गरज लागणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आज ट्विटवर पोस्ट करत महत्वाची माहिती दिली. (Government Schemes)
डोळ्यांतील बुबुळाच्या स्कॅनचा उपयोग
आधारकार्डसाठी पात्र व्यक्तीच्या बोटांचे ठसे उपलब्ध नसल्याच्या स्थितीत ‘आयरिस’ (IRIS Scan) अर्थात डोळ्यांतील बुबुळाच्या स्कॅनचा उपयोग करत आधार जारी करण्याचे निर्देश सरकारने शनिवारी दिले. केरळमध्ये एका महिलेला हाताची बोट नसल्याने आधार नोंदणी होऊ शकत नव्हती. यानंतर आयरिस स्कॅनिंगद्वारे महिलेचे आधार सुनिश्चित करण्यात आले. तसेच जर डोळ्यांचे स्कॅन काही कारणास्तव येत नसल्यास बोटांच्या ठशावर आधार जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती- तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आधार सेवा केंद्रांना यासंबंधी निर्देश देण्यात आल्याची माहिती दिली.
यामुळे केला आधार नियमांत बदल ?
केरळमधील एका महिलेच्या हाताला बोटे नसल्याने आधार नोंदणी होत नव्हती. यानंतर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नंतर फक्त आयरिस स्कॅनच्या आधारावर तिचा आधार क्रमांक जारी करण्यात आला. पर्यायी बायोमॅट्रिक्स घेत पुसट बोटांचे ठसे किंवा अशा प्रकाराच्या दिव्यांग लोकांसाठी आधार जारी करण्याचे निर्देश सर्व आधार सेवा केंद्रांना देण्यात आल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. (Aadhaar Card)
*???????????????????????? ???????????????????????????? ???????????????????????????? ???????????????????????????????? ???????????? ????????????????????????????*#UIDAI sensitizes enrolment agencies to assist such persons in enrolling for Aadhaar.
“Standard advisory issued to all Aadhaar Service Kendras to issue Aadhaar to those having blurred finger…
— Aadhaar (@UIDAI) December 10, 2023