पुणे: रावेत येथील आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ एक दुःखद घटना घडली, जिथे गणेश लाड नावाच्या एका तरुणाने अभिजित गोळे या त्याच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करताना जीव गमावला, अभिजित गोळे याने रेल्वे ट्रॅकवर उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अभिजितने गणेशशी गर्लफ्रेंड आणि त्यांच्या कॅफे व्यवसायाशी संबंधित आर्थिक समस्यांवरून वाद झाले होते. दरम्यान, अभिजित आत्महत्या करतो म्हणून रेल्वे रुळावर जाऊन उभा राहिला. परंतु ट्रेन जवळ येताच अभिजित अचानक बाजूला झाला, मित्र आत्महत्या करत असल्याने त्याला वाचवण्यासाठी गणेश गेला असता समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अभिजित गणेशला मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. गणेशचे वडील विठ्ठल लाड यांनी रावेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून अभिजितविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.