येरवडा, (पुणे) : कल्याणीनगर येथील एस.एल. एन्टरप्रायजेस या जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून लेडीज व जेन्ट्स अंडरगार्मेंट्स, टी-शर्ट्स, नाईट पॅंट्सची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला येरवडा तपास पथकडून अटक करण्यात आली आहे. जून 2024 पासून वेळोवेळी वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता
गणपत मांगीलाल डांगी (वय 44, रा. विठ्ठल नगर, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून 7 लाख 30 हजार रुपयांचा लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, व नाईट पॅन्ट असा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील एस.एल. एन्टरप्रायजेस या जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून जून 2024 पासून वेळोवेळी लेडीज व जेन्ट्स अंडरगार्मेंट्स, टी-शर्ट्स, नाईट पॅंट्स आदी वस्तू चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा येरवडा तपास पथक शनिवारी (ता. 19) परिसरात तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे आणि पोलीस हवालदार सागर जगदाळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी कल्याणीनगर परिसरात थांबलेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपी गणपत डांगी याला अटक केली.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी 7 लाख 30 हजार रुपये किमतीचे लेडीज व जेन्टस अंडरगारमेंट, टि शर्ट, नाईट पॅन्ट हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे,पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाय, सुधीर सांगडे यांनी केलेली आहे.