अमरावती : अमरावतीतल्या मेळघाटातील बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही संपलेलं नाही. मात्र, सुखदबाब म्हणजे कुपोषण आणि बालमृत्यूचा दर दहा वर्षांच्या तुलनेत कमी आहे. सध्याचा मृत्यू दर पाहिला तर सहा टक्के आहे. परंतू समृद्धी महामार्गापासून 100 ते 125 किमी असलेल्या मेळघाटातील अनेक गावात धड रस्ते नाहीत. आरोग्याच्या पायाभूत सुविधाही नाहीत. मेळघाटातील सर्वात मोठ्या धारणी परिसरात आजही कुपोषणाची प्रकरणं सर्वाधिक आहे. एप्रिलपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू झाला आहे.
बालके अधिक प्रमाणात कुपोषित असून येथील परिस्थिती चिंताजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कुपोषणमुक्तीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र आदिवासी समाजातील लोकांचे स्थलांतर तसेच परिस्थितीमुळे गरोदर महिलांना न मिळणारा सकस आहार, यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित जन्मते.
रोजगार मिळत नसल्याने मेळघाटातील बहुतेक गाव स्थलांतरीत होतात. 50 टक्क्यांहून अधिक घरांना टाळं लागलंय. तेथील लोक कामधंद्याच्या शोधात मध्य प्रदेश, गुजरातला विस्थापित झालेत. या स्थलांतरामुळे कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. एकीकडी रोजगारासाठी सरकारने मनरेगा (महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट) ही योजना आणली. मात्र आजही रोजगारासाठी स्थलांतर होत असेल तर रोजगार हमी योजना फोल ठरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 43 in 7 months of