Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आपटीतील 25 वर्षीय विवाहिता बेपत्ता ; 11 महिन्यांच्या बाळामुळे परिसरात हळहळ, शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 5 August 2026, 14:39

शिक्रापूर : टेलरिंगचे साहित्य आणण्यासाठी कोरेगाव भीमा येथे जाते असे सांगून घराबाहेर पडलेली 25 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आपटी (ता. शिरूर) येथे मंगळवारी (ता. 04) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

निकीता अविनाश गाडेकर (वय-25, रा. सदर) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पती अविनाश गाडेकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश गाडेकर हे 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता फुलगाव येथील ‘हनीवेल ऑटोमेशन प्रा. लि.’ कंपनीत कामावर गेले होते. दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईने फोन करून माहिती दिली की, सुन निकीता ही दुपारी एक वाजता कोरेगाव भीमा येथे शिवणकामाचे साहित्य आणायला जाते म्हणून गेली होती, मात्र ती अद्याप परतलेली नाही. तसेच तिचा मोबाईल नंबर सतत ‘स्विच ऑफ’ लागत आहे.

घरी 11 महिन्यांची तान्ही मुलगी आईविना रडत असल्याने पती अविनाश गाडेकर यांनी तातडीने कोरेगाव भीमा, आपटी आणि आसपासच्या परिसरात नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला मात्र निकीता यांचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता असल्याची खबर दिली.

 

सदर महिलेचा रंग गोरा, उंची 4 फूट 8 इंच, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, शरीरयष्टी मध्यम, डोळे काळे, डाव्या बाजूला गळ्यावर तीळ असून हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस, हिरवा स्कार्फ, पायात राखाडी (ग्रे) रंगाचे शूज, गळ्यात पिवळ्या धातूचे मंगळसूत्र आहे. मराठी आणि हिंदी भाषा बोलते.

दरम्यान, सदर वर्णनाची महिला कोणाला दिसून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने शिक्रापूर पोलीस ठाणे किंवा पती अविनाश गाडेकर (मो. 7276266017) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासन आणि गाडेकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यांवर पट्टी, तरीही अचूक उत्तरे! लोणी काळभोरच्या 6 वर्षीय चिमुकल्याची भन्नाट कामगिरी ; NiBM अबॅकस प्रशिक्षणाची कमाल

Wednesday, 5 August 2026, 19:32

सासवड येथे खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने तब्बल 22 लाखांची फसवणूक ; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

Wednesday, 5 August 2026, 19:10

दौंड पोलिसांचा गुंडांना मोठा दणका; सात गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध

Wednesday, 5 August 2026, 18:43

बीड जेलमध्ये ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’चा आरोप; वाल्मिक कराडला नागपूरला हलवा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Wednesday, 5 August 2026, 18:15

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावरच भविष्य ठरणार; कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा दावा!

Wednesday, 5 August 2026, 17:52

धानोरीच्या राखीव वनात ‘मियावाकी’ हरितक्रांती; वनविभागाकडून स्थानिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ

Wednesday, 5 August 2026, 17:41
Next Post

बेनवडी फाट्यावर भीषण अपघात! इनोव्हा-थारची समोरासमोर जोरदार धडक; तिघेजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.