लोणी काळभोर : उरुळी कांचन, हडपसर, यवतसह तोट्यात असलेले २५ पीएमपी मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. तर प्रवाशांच्या प्रतिसादानंतर ४ नवीन मार्ग सुरु करण्यात आले आहेत.
पुणे शहरातील या २५ मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद खूप अल्प प्रमाणात मिळत असल्याने पीएमपी प्रशासनाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि येत्या २ऑगस्ट रोजी हे तोट्यातील मार्ग बंद करण्यात येणार आहेत. तर शहरातील काही मार्गांवरचा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता २० मार्गांवर बसच्या फेऱ्या अधिक वाढवण्याचा निर्णयदेखील पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
१) बंद करण्यात आलेले पीएमपी मार्ग खालीलप्रमाणे :
सासवड-उरुळी कांचन,
उरुळी कांचन-खामगाव
हडपसर-उरुळी कांचन
हडपसर-फुरसुंगी हरपळेवस्ती
हडपसर-फुरसुंगी शेवाळेवाडी
शेवाळेवाडी-पिंपरीगाव
यवत-सासवड
मनपा भवन-आदित्य गार्डन सोसायटी
स्वारगेट-मिडीपॉइंट
स्वारगेट-कात्रज मार्गे लेकटाउन
स्वारगेट-बोपदेव घाट मार्गे सासवड
तळजाई पठार-स्वारगेट
कात्रज-कोंढणपूर
वाघोली-न्हावी सांडस
डेक्कन-पिंपळे निलख
डेक्कन-मिडीपॉइंट
वाघोली-करंदीगाव
पुणे स्टेशन-ताडीवाला रस्ता
निगडी-देहूगाव
हिंजवडी फेज ३-इंटरसिटी फेज ३
चिखली-हिंजवडी माण फेज ३
भोसरी-पाबळगाव
राजगुरुनगर-कडूस
पिंपळे गुरव-शितळादेवी चौक१७.
पिंपळे गुरव-काटेपुरम
२) नव्याने सुरु करण्यात आलेले मार्ग
स्वारगेट-नांदेड सिटी
मनपा भवन-खराडी
हडपसर-वाघोली मार्गे इऑन आयटी पार्क
कात्रज-पुणे स्टेशन मार्गे गंगाधाम