Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२० वा बळी! पुणे शहराला हादरवणाऱ्या विषारी दारूने घेतला उरुळी कांचनमधील तरुणाचा जीव; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 30 May 2026, 13:50

उरुळी कांचन , ता. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. हडपसर परिसरातील विषारी दारूमुळेच उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका तरुण रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दृष्टी अधू होणे, मळमळ, तोंडातून फेस येणे आणि प्रकृती झपाट्याने खालावणे अशी गंभीर लक्षणे दिसल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी (ता.२९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे विषारी दारूमुळे मृतांचा आकडा आता २० वर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उमेश अवचर (वय ३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो उरुळी कांचन परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी उमेशने स्थानिक दारू गुत्त्यावरून दारूचे सेवन केले होते. त्यानंतर अचानक त्याला मळमळ, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि दृष्टी धूसर होण्याचा त्रास सुरू झाला. काही वेळातच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उरुळी कांचनमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

विशेष म्हणजे, पोलिसांच्या तपासात ज्या अवैध दारू निर्मिती साखळीचा उलगडा झाला आहे, त्याच नेटवर्कशी संबंधित भागातील दारू अड्ड्यावरून उमेशने दारू घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विषारी दारूचे लोण केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरते मर्यादित नसून आता उरुळी कांचनसारख्या ग्रामीण भागातही पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, या दारूकांडामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काहींनी घरातील कमावते सदस्य गमावले आहेत, तर अनेकजण अजूनही विविध रुग्णालयांमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. या पार्श्वभूमीवर अवैध हातभट्टी आणि विषारी दारूच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उमेश अवचरच्या मृत्यूनंतर आता ग्रामीण भागातही विषारी दारूच्या विळख्याची भीती वाढली असून, अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “विषारी दारू तयार करणाऱ्या आणि तिचा पुरवठा करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून हा प्रकार म्हणजे एक प्रकारे हत्या आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46
Next Post

आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? महाराष्ट्राचे लक्ष लागून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.