मुंबई : मुंबईकरांना बेस्टचा प्रवास चक्क १ रुपयात करता येणार आहे. सुपर सेव्हर योजनेंतर्गत चलो अॅपचा वापर केल्यावर प्रवास्यांना वरील योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुंबईत बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकिट काढणे, पास काढणे चलो अॅपमुळे अगदीच सोयीस्कर झाले आहे. बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी उपक्रमाने चलो अॅपचे अनावरण केले होते. याअंतर्गत आता बेस्टने सुपर सेव्हर योजना लॉंच केल्या आहेत. चलो अॅपचा वापर केल्यामुळे आता पैशांचीही बचत होणार आहे.
सुपर सेव्हर योजनेची माहिती
चलो अॅप ओपन केल्यावर तुम्हाला ही Super Saver Offer दिसेल. या सुपर सेव्हर ऑफरद्वारे तुम्हाला ७ दिवस, बसच्या ५ फेऱ्यांच्या प्रवासासाठी फक्त १ रुपया तिकीट दर भरावे लागतील. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी अस्तित्वात आहे. बसमध्ये प्रवास करताना तुम्ही हे तिकीट Activate करून शकता. संबंधित कंडक्टरला तुम्हाला केवळ उतरण्याचे ठिकाण सांगावे लागेल, स्कॅन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रिनवर ई-तिकीट दिसेल. फक्त चलो अॅपचा वापर करणारे प्रवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
बेस्टच्या इतर सुपर सेव्हर योजना!
प्रवाशांनी दैनंदिन तिकीट किती रुपये असते त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर सेव्हर प्लॅन उपलब्ध होतील. तसेच पत्रकार यांच्यासाठी ३९५ रुपयांना मासिक पास तर दिव्यांग व्यक्तींना ३ वर्षे मोफत पास देण्यात येणार आहे. तर शासकिय सेवानिवृत्त व्यक्तींना ९०० रुपयांचा मासिक पास मिळेल.