युनूस तांबोळी
शिरूर : साहेब, अहो बिबट्यामुळे माणस मरायला लागलीत. शेतात काम करता येत नाही मग जीवन जगायच कस ? घाबरून जाऊ नका म्हणता माणसावर होणारे हल्ले थांबत नाही. फक्त सबुरीचा सल्ला यामुळे गावात भितीचे वातावरण झाल आहे. बिबट्याच्या भितीने शाळेतील मुलांना पाठवायच कस ? कोरोनाने शिक्षणाच अलबेल झाल त्यात बिबट्याच्या हल्ल्याने एकेक घटना समोर येऊ लागली आहे. वनविभाग फक्त दिखाऊ भूमिका घेत असल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. नरभक्षक बिबट्या असाच धुमाकूळ माजवत राहिला तर सर्वसामान्य माणसान जगायच कस ? अशा नकारात्मक प्रतिक्रिया जांबूत ( ता. शिरूर ) येथील निषेध सभेतून येत होत्या.
शिरूर तालुक्यातील जांबूत येथे महाविद्यालयीन युवती पूजा नरवडे हिटा दुर्दवी अंत झाला.वन विभागाकडून या कुटूंबाला तातडीची मदत म्हणून दहा लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाला नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जुन्नर वनविभागाचे उपवनसंपरक्षक अमोल सातपुते, बाळासाहेब घुले, माउली आस्वारे, रामचंद्र ढोबळे, भिमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकात ढगे, सरपंच दत्ता जोरी, दामुशेठ घोडे. बाळासाहेब फिरोदिया, बाळासाहेब पठारे, अनिल लबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर , बाळासाहेब बदर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अहो आम्ही लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही वनविभाग असले तरी मनमानेल तसे कसे करू शकता. लाख मोलाच्या माणसाचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव जाऊ लागला आहे. यासाठी लवकरच माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करावी लागेल.