सुरेश घाडगे
परंडा : परंडा शहरातील राजापुरा गल्लीतील प्राचीन भवानीशंकर मंदिराच्या सभागृहाचे उदघाटन व लोकार्पण आमदार ठाकुर यांच्याहस्ते गुरुवारी (ता. २५) करण्यात आले.
माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या आमदार स्थानिक निधी अंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी या सभागृहासाठी देण्यात आला आहे. या सभागृहाचे नुकतेच काम पूर्ण झाले होते. त्यानंतर या सभागृहाचे उदघाटन व लोकार्पण आमदार ठाकुर यांच्याहस्ते करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार ठाकुसह-कुटुंब भवानीशंकर मंदिरात आरती केली. यावेळी भाविकांना महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. तर नागरिक व भाविकांनी आनंद व्यक्त करुन आ. ठाकुर यांचा सत्कार केला.
यावेळी अर्जुनसिंह ठाकूर, जयसिंह ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकुर,मनोजसिंह ठाकूर, सुहाससिंह ठाकूर, सागर ठाकूर ,संकेतसिंह ठाकूर, पुजारी किशोर बैरागी , सुनिल शुक्ला, दीपक ठाकुर, किरण ठाकुर, प्रशांत मिश्रा, रविंद्र मिश्रा ,संतोष करमाळकर, संतोष मिश्रा आदि उपस्थित होते .